eAgroCare

GranthPub
  • Browse
  • Our Plans
  • How it works?
  • Kids Zone
  • Contact Us
  •   Join the Library
  •   Login

Book Details...


For Here Or To Go

By Velankar Aparna

Publisher: Mehta Publication

ISBN: 9788177668629

Number of Pages: 286

फॉर हिअर, ऑर टू गो?' इथेच थांबून आस्वाद घेणार, की इथले खाद्यपदार्थ सोबत घेऊन "तिकडे'' जाणार?- जगभरातल्या "मॅकडोनल्डस्''मध्येविचारला जाणारा हा प्रश्न. चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय मानसिकतेची कुंपणं तोडून महासागर ओलांडण्याचं धाडस करणाऱ्या मराठी माणसांनी उत्तर अमेरिकेत नवं आयुष्य उभारायची धडपड सुरू केली, त्या क्षणापासून या प्रश्नाने त्यांचा पिच्छा पुरवला. "इथेच'' राहून इथले होणार? की "इकडली'' पुंजी बांधून घेऊन "तिकडे'' परत जाणार? खिशात आठ डॉलर्स, बॅगेत वीस किलो सामान आणि अज्ञाताला तोंड देण्याइतपात मनाचा हिय्या एवढ्या भरवश्यावर या माणसांनी दहा हजार मैलांची उडी मारली, तर रात्रीचा दिवस आणि दिवसाची थेट रात्रच. उत्तर अमेरिकेच्या भूमीवर पाय रोवणारी मराठी माणसांची पाहिली पिढी. त्या पिढीच्या संघर्षाची ही कहाणी. परक्या देशात रुजण्यासाठी दिलेल्या झुंजीची... सोसलेल्या असह्य ओढाताणीची... अपार कष्टांची.. हिंमतीची... अपरंपार वैभवाची.. झळाळत्या यशाची आणि एकट्या, एकाकी अपयशाचीही!

 Over 75,000+ Books...

 Free Home Delivery & Pickup...

 Thousands of Titles in Marathi, English and Hindi...

Home  Contact Us 

Copyright © 2016 SaiRam Infotainment LLP...All rights reserved.